top of page
Search

ब्रँड झाल्यावर बिझनेस प्रॉफिट वाढेल का?

तुम्ही एखाद्याचा व्यवसाय नावारूपाला आल्याचं ऐकलंय का? काय नांव आहे आपल्या व्यवसायाचं? तुमच्या व्यवसायाचं नांव किती नावीन्यपूर्ण आहे? तुमच्या व्यवसायाचं नांव कुठे दिसतं का तुम्हाला? तसंच नाव कुठे पाहिलंय का? तुमच्या व्यवसायाचं नाव जर कुठल्या दुसऱ्या व्यवसायाचं एकाच वेळी असेल तर तुमच्या व्यवसायाची ओळख एकमेव अशी राहणार नाही. ह्यासाठी सर्वात आधी तुमच्या व्यवसायाचं नांव म्हणजेच बिझनेस नेम किंवा ब्रॅंडनेम हे एकमेव असायला हवं. उदाहरणार्थ तुमचं उपहारगृह असेल. आणि तुमची खासियत जिभेवर रेंगाळणारी चव अशी असेल. तर त्याला सुदंर साजेसं नांव असायला हवंच. आसपासच्या दोन चार उपहारगृहांचं नांव ‘अन्नपूर्णा’ असेल तर लोक कदाचित आपला ब्रँड चारचौघांसारखाच समजतील. म्हणून बिझनेस खास असेल तर नाव चारचौघांच्या इतर उपहारगृहासारखं नको. आपली खासियत एकमेव तर आपला ब्रँड सुद्धा एकमेव असायला हवा.



व्यवसायाचं नांव एकदा नक्की झालं, की तुमचा बिझनेस ‘ब्रँड’ होण्यासाठी तयार आहे. ब्रँड म्हणजे तुम्ही कष्टाने मिळवलेली तुमची हक्काची खासियत. इथे उपहारगृहाच्या बाबतील सांगायचं तर तुमच्या हातची रुचकर चव जी दुसरीकडे कुठेच मिळत नाही. त्यासाठी नांव सुद्धा तितकंच खास लोकांना पटणारं आणि रुचणारं नको का?

कारण जे रुचेल तेच लोकांच्या लक्षात राहील.

“सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा” ह्या आपल्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात ब्रँड बॉण्ड निलेश B+ सांगतात त्याप्रमाणे, ब्रॅंडनेम हे नांव विशिष्ट, अस्सल असतं.. त्यामुळे ते तुमच्या संभाव्य ग्राहकांसोबत ट्यून झालं पाहिजे. प्रतिध्वनीत झालं पाहिजे. आणि लोकप्रिय होऊन त्यांच्या मनात टिकलं पाहिजे. ह्याच नांवाने तुमच्या ग्राहकांसोबत विश्वास निर्माण केला पाहिजे. आणि तो टिकवून ठेवला पाहिजे.


ते पुढे म्हणतात,

गेली अनेक वर्षे विविध ब्रँडसाठी ब्रॅंडनेम ठरवताना आपला ग्राहक वर्ग, त्यांच्या आवडी निवडी, लोकेशन, संस्कृती, ट्रेंड , नावाचा अर्थ, उच्चरण, स्पेलिंग्स, अशा अनेक बाबी विचारात घेतल्या जातात.

हे आग्रहाने ब्रॅण्डिंग करीता आलेल्या व्यावसायिकांना सांगतात की, “एखादे प्रिय व्यक्तीचे नांव, आपली श्रद्धास्थाने, किंवा अनेकांनी वापरून आधीच लोकप्रिय झालेली सामान्य नांवे टाळा. नांवाच्या बाबतीत जागरूक, अभ्यासू, आणि चोखंदळ राहा. नाहीतर आपले ग्राहकच आपल्याला नांव ठेवतील.”


त्यानंतर महत्वाची ओळख असते तो म्हणजे चेहरा. जसं आपण एखाद्या व्यक्तीला चेहऱ्याने ओळखतो तसंच लोक तुमचा व्यवसाय हा ब्रँड लोगो च्या चित्रावरून लक्षात ठेवतात. त्यातही तो लोगो व्यवसायाशी मिळताजुळता अर्थपूर्ण, कलात्मक आणि एका विशिष्ट रंगसंगतीचा असायला हवा.


लोगो विषयी एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, ब्रँड लोगो हा ब्रॅड साइन/सिम्बॉल/आयकॉन, टॅगलाईन, बिझनेस लाईन अशा वेगवेगळ्या गोष्टींचा एक कलात्मक बंध असतो.

काही ब्रँड करीता ब्रँड चे चिन्ह हेच त्या ब्रॅण्डचा लोगो असतो. तर काही ब्रँडचे फक्त नांव हेच त्याचा लोगो असतो.

पुस्तकांत रोजच्या वापरातील ब्रॅंड्सची उदाहरणं देऊन निलेश सर आपल्याला पटवून देतात,

Apple has NO LOGO (only sign)

Canon has NO SIGN (only Logo)


एवढा महत्वपूर्ण असलेला ब्रँड लोगो आपण स्वतः किंवा एखाद्या नवशिक्या डिझायनर कडून न करून घेता तो एखाद्या अनुभवी ब्रँड तज्ञ आणि व्यावसायिक डिझायनर कडून करून घ्यावा. स्वतःच चुकीचा लोगो तयार करणे ही एक गंभीर चूक असल्याचं पुस्तकाचे लेखक आपल्या अनुभवातून सांगतात.


लोगोमधील रंग ज्याला आपण ब्रँड कलर म्हणू शकतो. ह्याच रंगात ब्रँड रंगून जातो. सॅमसंगचा निळ्या रंगाचा लोगो असल्याने आपण सॅमसंगच्या शो रूम मध्ये गेल्यावर निळ्या रंगाची उधळण दिसते. त्याचप्रमाणे तुमच्या कोणत्याही आवडत्या ब्रँडचा विचार करून त्याच्या लोगो मधील रंगांचा आणि त्याच्या इतर रंगसंगतीचा विचार करा. तुमच्या आता लक्षात येईल की ब्रँड कलर हा ब्रॅण्डची ओळख लोकांना लगेच करून देतो.


आपण ब्रँड नेम, ब्रँड लोगो, ब्रँड कलर विषयी पाहिलं. ब्रँड नेम मुळे आपण आपला ब्रँड इतरांपेक्षा किती वेगळा आहे ते पहिल्याच भेटीत सांगू शकतो. ब्रँड लोगो तर आपल्या व्यवसायाचा चेहरा आहे ज्यामुळे लोक लगेच ओळखतात.

आणि आपल्या आवडीच्या ब्रँड चा रंग तर लोकांच्या डोक्यात चिकटून फिट बसतो.

ह्याच्या जोडीला ह्या सगळ्या गोष्टींचा सुंदर मिलाफ करून साधलेलं कलात्मक कॉर्पोरेट ब्रॅण्डिंग आपला ब्रँडला जिवंत व्यक्तीप्रमाणे संजीवनी देते.


एवढं सगळं केल्यावर आपला साधासा स्वप्नातला व्यवसाय सुद्धा एक ब्रँड म्हणून खऱ्या अर्थाने नावारूपाला येतो.

आणि तुमच्या व्यवसायाला तुमचे ग्राहक ‘ब्रँड’ म्हणून ओळखतात.



आता आपला प्रश्न, हे अशा अनुभवी आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेलं ब्रॅंडिंग आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवते. लोकांच्या मनात घर करून राहतो आपला व्यवसाय. आता अशा ओळखीच्या ब्रँडच्या ब्रँडेड वस्तू किंवा सेवा लोक जास्तीत जास्त पसंत करतील. कारण ते तुमचा व्यवसाय ओळखतात. खूप सोपं गणित आहे.

जेवढी प्रभावी ओळख + जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचलेली ओळख = जास्त ग्राहक आणि जास्त नफा.


मग तुम्हालाही पटलं असेलच की आपला व्यवसाय ब्रँड व्हायलाच हवा. ब्रँड असल्याचा शिक्का एकदा बसला की बिझनेसच्या दुनियेत आपलं प्रस्थ वाढलं म्हणून समजा.

ब्रॅण्डिंग वरील अभ्यासपूर्ण माहिती वाचण्याकरिता खालील लिंक वर क्लीक करून,

“सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा !!!” हे पुस्तक नक्की वाचा. गेली ३० वर्षांहून अधिक काळ ब्रँड घडवणारे बंद तज्ञ निलेश B+

ह्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले अभिनव पुस्तक.

हे पुस्तक म्हणजे ब्रॅण्डिंग ची पुस्तक रूपातील लिखित कार्यशाळाच म्हणा नं! अनेक महत्वाच्या विषयवार ब्रॅण्डिंग मधील तज्ञ वाचकाला त्याच्यामधील विवेक जागृत करतात. ब्रँड होताना स्वतःचं SWOT


ब्रॅंडिंग वरील असेच सहज सोपे लेख वाचण्यासाठी आम्हाला फॉलो नक्की करा. पुढचा लेख लवकरच.


56 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page