top of page
Search

लोगोची गोष्ट किती खरी किती खोटी!

Updated: Nov 24, 2022

लोगो घ्या लोगो, फक्त ५० रुपयांत तुमच्या ब्रँडचा लोगो!

ही जाहिरात तुम्ही वाचली आहे का? जाहीरात नव्हे आरोळी म्हणा ! हीच आरोळी देऊन बरेच लोक लोगो बाजारात विकत असतात. मात्र आमच्यासारखे ब्रॅंडिंग क्षेत्रातील लोक लोगो चक्क ५०००० रुपयाला सुद्धा विकतात. काय ?????आता तुमचे डोळे विस्फारले असतील तर नवल नाही.

५०००० रुपये कुठे आणि फक्त ५० रुपये कुठे.

लोगोची खरी किंमत किती आणि कोणती? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. काय खरं आणि काय खोटं हे समजतच नाही.

काय आहे लोगोची खरी गोष्ट? तीच खरी गोष्ट आपण ह्या लेखातून उलगडणार आहोत.



“The strongest logos tell simple stories.” — Sol Sender

म्हणजेच खरे लोगो साधी गोष्ट सांगतात.

तुम्ही व्यावसायिक असाल तर लोगो ची गरज व्यवसायासाठी किती तीव्र असते हे तुम्हाला चांगलंच माहित असेल. लोगो म्हणजे फुलं, पानं आणि चित्र किंवा विशिष्ट रंगसंगतीचा आकार एवढंच डोळ्यासमोर येतं. हे चित्र लोगोचं असू शकतं मात्र ही लोगोची खरी ओळख नाही. लोगोची खरी ओळख त्याहून कितीतरी पटीने अधिक आहे.

हीच लोगोची खरी ओळख जेव्हा आपण समजून घेऊ. ती आपल्याला पटेल तेव्हाच लोगो ची खरी गोष्ट आपल्याला समजेल. ही गोष्ट आपण एका प्रोफेशनल लोगो बनवणाऱ्या जाहिरात तज्ज्ञाकडून समजून घेऊया.

ह्या संदर्भात आपल्याला मदत होईल ती स्वतःच्या अनुभवाच्या जोरावर स्वतःला ब्रँडबॉण्ड म्हणवणाऱ्या ब्रॅन्डबॉन्ड निलेश B+ ह्यांनी लिहिलेल्या “सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा” ह्या पुस्तकाची.


ते आपल्या पहिल्याच भेटीत स्पष्ट करतात की, “ब्रँडलोगो म्हणजे ब्रँडचा व्यावसायिक चेहरा!”

चेहरा अर्थातच ओळखीचा असतो किंवा अनोळखी. ओळखीच्या चेहऱ्याला आपण जास्त प्रतिसाद देतो. तर अनोळखी चेहऱ्याला मात्र तितकीशी साद घालता येत नाही. ही ओळखीची हाक मिळावी असं वाटत असेल तर आपल्या व्यवसायाचा चेहरा काळजीपूर्वक घडवायला हवा. म्हणजेच चेहऱ्यावरून जसा माणूस तसाच लोगोवरून तुमचा व्यवसाय लोकांना ओळखता यायला हवा.


आपल्या गेल्या तीन दशकांच्या कारकिर्दीचा मागोवा घेत अनुभव समृद्ध झालेले निलेश B+ म्हणतात की, “दुर्दैवाने बऱ्याच व्यावसायिकांकडे एकतर त्यांचा ब्रँड लोगो नसतो किंवा त्यांना असं वाटतं की त्यांना ब्रँड लोगोची आवश्यकता नाही. आपल्यापैकी बऱ्याच व्यावसायिकांचा लोगो हा बालिश, मजेशीर आणि असंबद्ध आहे.”


(खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही “सिद्ध व्हा प्रसिद्ध व्हा” हे ब्रॅंडिंग ची संपूर्ण माहिती सांगणारे पुस्तक विकत घेऊ शकता.)

https://www.ugamcreative.in/brand-bond


आता अशी कान उघडणी केल्यावर आपण आपला ब्रँड लोगो नक्की तपासून पुन्हा एकदा पहिला असेल. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे फक्त ५० ते १०० रुपयांत मिळणारा लोगो हा असाच बालिश, मजेशीर आणि असंबद्ध असण्याची शक्यता अगदी १००% आहे. कारण असा लोगो डिझाईन करणारी व्यक्ती कोणताच विचार घेऊन लोगो डिझाईन करत नाही. किंवा ब्रँड च्या कार्याशी त्या लोगोचा काहीच संबंध नसतो. किंवा अगदी केवळ वरवरचा संबंध असतो. उदा. कपडे विकणाऱ्या ब्रॅण्डचा लोगो हा नुसता शर्ट किंवा टी शर्ट चा आकार असेल.

पण ब्रँड लोगो हा ह्यापेक्षा अधिक क्रिएटिव्ह विचारातून आणि संकल्पनेतून जन्माला आलेला आकर्षक ओळख सांगणारा असेल. आता अशा ब्रँड लोगोच्या निर्मितीसाठी लागणारा वेळ आणि मेंदू थकवणारी प्रक्रिया लोगोची किंमत वाढवते. एखाद्या कलाकाराचा वेळ आणि त्याची वर्षानुवर्षे कमावलेली सर्जनशीलता हीच त्या लोगोला ब्रँड करता अगदी सुयोग्य बनवते आणि त्याचबरोबर त्याची किंमतही वाढवते.


असा समृद्ध, सुयोग्य आणि ब्रँड शी सुसंगत ब्रँड लोगो जेव्हा तुम्ही खरेदी करता तेव्हाच तुमच्या ब्रँड ला खरा चेहरा मिळतो. मग खऱ्या अर्थाने कष्टातून साकारलेल्या व्यवसायाचा ब्रँड उभा राहतो आणि ब्रँड ग्राहकांसमोर येतो तो ब्रँडलोगो रुपी चेहरा घेऊनच.


ब्रँड होण्याची इच्छा असलेला कोणीही व्यावसायिक जेव्हा आमच्या कडे येतो तेव्हा सुरुवातीला त्याच्या मनात धूसर असलेली ब्रँड लोगोची प्रतिमा नक्कीच स्पष्ट होते. लोगो चे शास्त्रीय नियम पाळून बनवलेला लोगो क्षणांत व्यावसायिकाला आवडतो. ज्यामध्ये ब्रँडची ओळख, ब्रँडचा उद्देश, आकार, रंगसंगती ह्याचा खोलवर विचार केलेला असतो. जो विचार अल्प किमतीत मिळणाऱ्या लोगोत खचितच असतो.


हीच आहे किंमती वाटणाऱ्या लोगोची खरी गोष्ट!

आपल्या ब्रँडचा लोगो असाच खराखुरा आणि अर्थपूर्ण बनवून घेऊ शकता. खालील लिंक वर क्लीक करून

आमच्या वेबसाईटला एकदा अवश्य भेट द्या.

https://www.ugamcreative.in/logo-design-services


202 views0 comments
bottom of page