बोले तो एकदम ब्रँडेड !😎
Updated: Nov 1, 2022

ब्रँड असा असतो की लोकांवर छाप पडली पाहिजे. 'एकदम ब्रँडेड वाटलं बुवा!' हीच ती ब्रँड ची छाप म्हणजे त्या ब्रँडला ब्रँडेड बनवणारा ब्रँड लोगो.
तुमचा ब्रँड जसजसा वाढत जाईल तसतसा तुमचा लोगो ग्राहकांच्या आयुष्यात अगदी रोजच्या परिचयाचा होणार आहे आणि तोही अगदी कायमचा. ह्याच तुमच्या सर्वांपेक्षा आगळ्यावेगळ्या ओळखीमुळे, तुम्ही गुंतवणूक, सेवा, वस्तू ह्यांचे व्यवहार करण्यायोग्य म्हणेजच विश्वासार्ह बनता. तुम्ही असे एक व्यावसायिक बनता ज्याला प्रोफेशनल म्हट्लं जातं. आम्ही अगदी प्रोफेशनल !
तुमच्या व्यवसायाच्या सुरुवातीलाच ब्रँडचा लोगो बाजारात दिसू लागला की असा प्रोफेशनल किंवा अस्सल व्यावसायिक असल्याचा चांगला समज ग्राहकांत निर्माण होतो. हा लोगो अर्थात तुमच्या व्यवसायासाठीच खास बनलाय असा खासाच जमून यायला हवा. म्हणजेच तुमचा लोगो जेवढा व्यवसायाच्या नावाला साजेसा, जेवढा प्रोफेशनल तेवढीच तुमच्या व्यवसायाची प्रोफेशनल ओळख मोठी.
लोगोची गोष्टच काही और आहे. जेव्हा तुम्ही वर्कआउटसाठी शूज खरेदी करायला बाहेर पडता, दुकानात नाइके शूजस् ची मस्त खरेदी होते, तोच तुम्हाला तुम्ही घेतलेल्या शूजस् सारखीच Nike swoosh✔️ असलेली ट्रॅक पॅंट दिसते. तेव्हा तुम्ही खरेदीसाठी त्वरित तयार असता. का? कारण Nike चे शूजस् चांगले असतातच मग तुम्ही नाइकेचे कपडे तेवढ्याच विश्वासाने खरेदी करता.
आणि मित्रांनो इथेच Nike हा तुमचा विश्वास संपादन केलेला ब्रँड बनतो. हा विश्वास चांगल्या प्रकारे डिझाइन केलेल्या लोगोवरून कमावला जातो. एकदा तुम्ही तुमच्या ब्रँडची ओळख असलेल्या
लोगोसह लोकांच्या लक्षात राहीलात की मग लोक तुमची प्रॉडक्ट्स पुन्हा पुन्हा ओळखून खरेदी करतात आणि इथेच ब्रँड निष्ठा जन्म घेते.
आणि तुमचा लोगो हाच तुमच्या ब्रँडचा चेहरा बनतो. 😀
एकदा लोगो आवडला आणि लक्षात राहिला की तुम्हाला तुमचे ग्राहक पुन्हा पुन्हा शोधत येतील आणि तेव्हासुद्धा तुमचा लोगो हीच गोष्ट आहे ज्यामुळे ते तुम्हाला प्रथमदर्शनी ओळखतील.🥰
तेव्हा तुमच्या व्यवसायाचा लोगो हाच प्रथम विकला जातो आणि तुमचं उत्पादन उत्कृष्ट असल्याचं ग्राहकांना सांगत राहतो.
तुमच्या व्यवसायाचा लोगो खरच ग्राहकांशी संवाद साधतो का? तुमचा व्यवसाय ब्रँडेड असल्याचं तुम्हाला वाटतं का? आम्हाला ऐकायला आवडेल.