दिवाळी पहाट आता सुरु होईल…
अजून दिवाळी पाठमोरी झाली नाही तोवर आम्ही म्हणतोय दिवाळी पहाट आता सुरु होईल. दिवाळी म्हणजे दिव्यांच्या ओळी. चार दिवसांची दिवाळी मनामनात नवा आनंद आणि उजेड सोबतच घेऊन येते. दिवाळीच्या अभ्यंगस्नानातील उटणाचा मनॊहारी सुगंध अजून मनात दरवळत असेल. दिव्यांच्या मंद प्रकाशात उजळणाऱ्या दीपावलीच्या पहाटेचे तेजोब्रह्म जीवनात अद्याप तेवत असेलच. दिवाळीची ही अपूर्वाई दरवर्षी नव्याची नवलाई भासते.
फराळाची चव वर्षभर जीभेवर रेंगाळत असते. घरातच बनवलेले फराळाचे चविष्ट पदार्थ कितीही खा तरी समाधान होतच नाही. सुखासमाधानाचे चार दिवस आपल्या माणसांच्या भेटीगाठींतल्या मायेत उजळून भुर्रकन उडून जातात. दिवाळीचे अत्तर त्यासोबतच उडून जाते. पणत्यांसोबत, कंदिलाच्या घडीसोबत दिवाळीचा आनंदही ठेवणीच्या कुठल्याशा कप्प्यात जाऊन बसतो.
आणि दिवाळी इथेच संपते…

थोडं थांबा!!! मी म्हणालो नं! दिवाळीची पहाट आता सुरु होईल.
पण ती कशी काय?
मित्रांनो, दिवाळीत दिव्यांच्या साक्षीने नव्या आनंदाची दारं मनात उघडली असतीलच. आणि नवा प्रकाश सुद्धा झाला असेल. नव्या ऊर्जेने जो तो भारावलेला असेल. आपल्याला अनेकदा माहीत असूनही आपण आजमावून पाहत नाही अशा स्वतःमधील नव्या क्षमता शोधण्याची हीच ती वेळ आहे, नवं काहीतरी करण्याची. स्वतःला नव्याने ओळखण्याची स्वतःची नवी ओळख बनवण्याची हीच ती वेळ आहे. हीच ती वेळ आहे जागं होण्याची. हीच ती पहाट आहे स्वतःमधून उजळत जाऊन जग उजळणारी. हीच ती मंगल वेळ आहे. स्वतःमधला निराशेचा काळोख डावलून उजेडाच्या वाटा चोखाळण्याची. स्वतःसाठी, स्वकियांसाठी थोडासा उजेड करण्याची. हीच ती नवी पहाट आहे नव्या दिवाळीची.
पण ह्यासाठी नेमकं काय करता येईल?
मित्रांनो, आपण जगत असताना आपलं व्यक्तिमत्व कसं आहे ह्यावर सगळी भिस्त असते. म्हणजेच तुम्ही काय मिळवणार आहात हे तुम्ही कोण आहात ह्यावर अवलंबून असतं. म्हणूनच तुम्ही कोण आहात हे सर्वात आधी बदलावं लागेल. ह्या बदलाची सुरुवात म्हणजेच प्रकाशमय दिवाळी पहाट. एकदा का ही पहाट झाली की लवकरच आपल्या रोजच्या जगण्यात एक नवा दिवस उजाडेल. जो आपली सगळी स्वप्न पूर्ण करणारा असेल. ह्या करता मात्र आपली मानसिक तयारी असायला हवी. स्वतःला जाणून घेण्यासाठी एखादया अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन असायला हवं.
ब्रॅंडिंग क्षेत्रातील तज्ञ निलेश B+ ह्यालाच आपल्या भाषेत पर्सनल ब्रॅंडिंगची सुरुवात असं म्हणतात. पर्सनल ब्रॅंडिंग म्हणजे एखादया माणसाचं ब्रॅंडिंग. आज आपण अनेक यशस्वी आणि प्रसिद्ध व्यक्ती पाहतो; ह्या व्यक्तींप्रमाणे आपणही प्रसिद्ध व्हावं असं मनात येतं. कारण ह्या व्यक्तींकडे असलेला पैसा, आर्थिक स्वातंत्र्य,मान मरातब,
गाडी बंगला, परदेश सफर,शिवाय वाढणारी लोकप्रियता आपल्या वाट्याला का बरं येऊ नये. क्रिकेटर्स, अक्टर्स, राजकीय नेते, गायक ह्यांच्यासारखं जगणं आपलंही असू शकतं का?
होय मित्रांनो, ह्या अशा प्रसिद्ध व्यक्तींप्रमाणे आपणही प्रसिद्ध होऊ शकतो ह्यात शंका नाही. फक्त त्याआधी तुम्हाला सिद्ध व्हावं लागेल. हा सिद्ध होण्याचा प्रवास कसा बरं सुरु होईल? कुठून सुरु होईल? त्यासाठी काय करावं लागेल?
ह्या सगळ्याचं उत्तर एकच आहे.आणि ते म्हणजे “सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा” हे पुस्तक.
जसं मी आधी म्हणालो, जीवन उजळणाऱ्या दिवाळीची उजळणारी पहाट स्वतःमधूनच होते. ह्या पुस्तकात प्रत्येक पानावर वाचता वाचता, अभ्यासता अभ्यासता स्वतःमधील होणारे बदल तुम्ही अनुभवू शकता. सोबतच अनेक KEY TASK सुद्धा आहेत. ज्यायोगे हे पुस्तक नुसतं वाचनीय, चिंतनीय होताना ब्रॅंडिंगचं प्रॅक्टिकल वर्कशॉप होतं. ब्रॅंडिंग क्षेत्रातील तब्ब्ल ३० वर्षांहून अधिक असलेला आपला अनुभव लेखक, संकलक निलेश B+ ह्यांच्या दमदार लेखणीतून वाचकांना नव्या प्रकाश वाटा दाखवून जातो हे नक्की.
ब्रॅंडिंग विषयी अधिक सखोल माहिती जाणून घेण्यासाठी 'सिद्ध व्हा प्रसिद्ध व्हा' हे पुस्तक आजच खरेदी करा.