top of page
Search

आहात का आपण सिद्ध? सुप्रसिद्ध होण्यासाठी? | सिद्ध व्हा, प्रसिध्द व्हा!

Updated: Nov 1, 2022

“आहात का आपण सिद्ध? सुप्रसिद्ध होण्यासाठी???”

आपल्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा!’ ह्या पुस्तकाच्या माध्यमातून

असा आगळावेगळा प्रश्न वाचकांना विचारत आहेत, ब्रॅन्डबॉन्ड निलेश B+.


प्रश्न विचारला म्हणजे उत्तर द्यावंच लागेल. कारण सुप्रसिद्ध होण्याची इच्छा सर्वांनाच असते. कुणाला व्यावसायिक म्हणून, कुणाला कलाकार म्हणून, कुणाला श्रीमंत व्यक्ती म्हणून, तर कुणाला अजून काही.

आता प्रसिद्ध व्हायचं तर आधी आपण करत असलेलं काम लोकांना आवडायला हवं. अहो आधी लोकांच्या मनावर ती तुमची वेगळी ओळख ठसायला हवी. जसं गाणं म्हटलं की लता मंगेशकर आठवते, क्रिकेट म्हटलं की सचिन तेंडुलकर आठवतो, अभिनय म्हटलं की अमिताभ बच्चन आठवतो. ह्या सगळ्या प्रसिद्ध व्यक्तींच्या मागे त्यांची कामातली सिद्धता आहे. स्वतःला सिद्ध करा मगच प्रसिद्ध व्हा! ही एवढी साधी सोपी गोष्ट प्रसिद्ध ब्रँड तज्ञ ब्रॅन्डबॉन्ड निलेश B+ आपल्या ३० वर्षांच्या ब्रॅंडिंगच्या अनुभवाच्या आधारे आपल्याला सांगत आहेत.


त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर ते म्हणतात,

“ इथे जो सिद्ध असतो.. जो स्वतःला सिद्ध करतो. आपल्या ध्येय कार्याशी कटिबद्ध असतो. वैविध्यपूर्ण अनुभवांनी जो समृद्ध असतो. तोच भविष्यात प्रसिद्ध होतो. आणि जो एकदा सुप्रसिद्ध होतो, त्याला ते कधीच सिद्ध करावे लागत नाही.. “


हे पुस्तक मी वाचायला हवं का?

मी म्हणेन वाचकांसाठी हे पुस्तक म्हणजे मेजवानी आहे. ब्रॅंडिंग करताना अनेक क्षेत्रातील नामांकित व्यावसायिकांना मार्गदर्शन करता करता निलेश ह्यांना झालेला साक्षात्कार जेव्हा ते त्याच्या सिद्धहस्त आणि ओघवत्या शैलीत मांडतात त्याक्षणीच वाचकाला ब्रँड होण्यामागचं रहस्य उलगडतं. रहस्य म्हणजे जे आजवरच्या अनेक पुस्तकातून कुणीच उलगडलेलं नाही.

ब्रँड कसा घडतो? ह्या प्रश्नाच्या पलीकडे घेऊन जाणारं हे पुस्तक आहे. आपल्या मनातल्या अनेक प्रश्नांना उदाहरण, दाखले, प्रसंगी सचित्र, सानुभव सादरीकरण ह्यातून हे पुस्तक ब्रँड होणं किती गरजेचं आहे ते आपल्याला पटवून देतं.


जसं जसे आपण वाचत जातो तसं सुरुवातीच्या काही प्रकरणात एका ठिकाणी आपली द्रृष्टी काही शब्दांवर खिळते.


“ स्वतःला नेमके ओळखायचे तरी कसे???

स्वतःला नेमकी दिशा द्यायची कशी???

आधी कधीच न मिळवलेलं मिळण्यासाठी

आधी कधीच न केलेलं करावं लागेल… आहात तुम्ही तय्यार?

स्वतःचा शोध घेऊन, स्वतःला आरपार बदलून… जिंकण्यासाठी!


आपण जसे आरशात दिसतो, स्वतःला समजतो तेवढीच आपली ओळख स्वतःला आजवर झालीय. फारफार तर काही लोक आपल्याला पुरतं ओळखून असतात. पण हीच ओळख जेव्हा प्रत्येक माणसाला होते. तुमचे चाहते बनतात, फॅनक्लब तयार होतात. हे सगळं अगदी प्रत्यक्षात होतं. ह्यासाठी आपला स्वतःवर विश्वास असायला हवा आणि आपला हाच विश्वास आपला श्वास व्हायला हवा. जगण्याचा ध्यास व्हायला हवा. ह्या सगळ्याचा तपशीलवार अभ्यास करायला ब्रँडबॉन्ड निलेश B+ आपल्याला प्रेरित करतात. कारण ह्या पुस्तकात जवळजवळ प्रत्येक प्रकरणात आपल्याला KEY TASK दिले गेले आहेत. जे पूर्ण करताच आपल्याला नव्याने आपण सापडतो ह्यात काही संशय नाही.


तर आजपासूनच स्वतःमधल्या ब्रँडचा शोध घ्यायला तयार आहात ना? ह्याकरता ‘Believe me, You are a Brand.’ हे अक्षरशः पटवून देणारं ‘सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा!’ हे पुस्तक आपल्या मदतीला आहेच.

72 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page