top of page
Search

ब्रँडच्या जन्माची चित्तरकथा - १

Updated: Nov 1, 2022

आपण ब्रँड व्हावं हे आजचं स्वप्न उद्यावर ढकलत आपली व्यवसायाची गाडी सुसाट चाललेली असते. असंख्य वळणं घेत, नवनव्या वाटांचा अनुभव घेत आपल्या व्यावसायिक ध्येयाच्या दिशेने निघालेली असते.

अशाच वळणावर उभं असताना “UberCab” चा जन्म झाला आणि प्रत्येक प्रवाशाच्या जीवनात एक वेगळंच वळण आलं. झालं असं, पॅरिसमध्ये डिसेंबर 2008 च्या एका बर्फ पडणाऱ्या थंडगार रात्री, ट्रॅव्हिस कलानिक आणि गॅरेट कॅम्प टॅक्सीची वाट पाहत असताना थरथर कापत उभे होते. पण कोणतंच वाहन मिळालं नाही.शेवटी नाईलाज म्हणून कॅम्पला त्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला त्याला आणि त्याच्या मित्राला जाण्यासाठी खाजगी कार भाड्याने बुक करावी लागली. त्यासाठी त्याला $800 खर्च करावे लागले. पण कार सर्व्हिस एवढी महाग का असावी? एकाहून अधिक लोकांना कारचं भाडं वाटून घेण्याची परवानगी दिल्याने ही महागाई कमी होईल, मग सामान्य लोकांना अशी कार सर्व्हिस नक्की परवडेल. आणि ह्याच नवीन विचारातून “Uber Cab” चा जन्म झाला.


पुढील वर्षी मार्चमध्ये, ह्या दोन सह-संस्थापकांनी ॲप विकसित केले आणि 2010 मध्ये न्यूयॉर्कमध्ये फक्त तीन कार वापरून त्याची टेस्ट केली. डिसेंबर 2012 मध्ये पॅरिसला परत आल्यावर, त्यांनी उबर लाँच केले तेही त्या रात्रीच्या आठ्वणीनंतर बरोबर तीन वर्षांनी. तेव्हापासून कंपनीने वेगाने वाढ केली आहे, प्रवासाच्या अर्थकारणामध्ये क्रांती घडवून आणली आहे. तरीही त्या प्रवासातील सर्वात प्रेरणादायी घटकांपैकी एक म्हणजे Uber ब्रँडच्या प्रत्येक घटकामध्ये आपली कथा सांगण्याची पद्धत आहे. Uber चे संपूर्ण प्लॅटफॉर्म ॲपपासून आवाज आणि डिझाइनच्या टोनपर्यंत ब्रँडिंगमध्ये मास्टरक्लास आहेत.



मित्रांनो, आज Uber आपल्या यशाच्या शिखरावर आहे. आज Uber जगातील सुमारे 83 देशांतील 700 शहरांमध्ये आपली सेवा चालवत आहे. 2017 मध्ये Uber चा अमेरिकेतील कॅबमध्ये 40% वाटा होता, तरीही मित्रांनो Uber यशाने हुरळून न जाता काळाबरोबर बदलत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन कल्पनेने Uber ने जगात झपाट्याने यश मिळवले, परंतु ह्या काळात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला आणि उबरला अनेक मोठ्या वादात अडकावं लागलं. पण मित्रांनो उबरने कधीही संकटांवर मात करू दिली नाही आणि वेळ पुढे जात राहिली. Uber नेहमी लोकांसाठी काहीतरी वेगळे करत असते.

आज आपण ज्या विश्वासाने uber ची प्रवासाचा विश्वासू सोबती म्हणून मदत मागतो. तेच ह्या ब्रँडचं यश आहे.



भारतात आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अशा अनेक यशस्वी ब्रँडच्या जन्माच्या आणि यशाच्या कथा सांगता येतील. आपल्या अवतीभोवती दिसणाऱ्या आणि तुमच्या आमच्यासारख्या व्यावसायिकांच्या मनात जन्म घेणाऱ्या अनेक ब्रँडच्या स्वतःच्या अशा जन्मकथा आहेतच आणि त्यादेखील तितक्याच रंजक आणि प्रेरणादायी असतील ह्यात काही शंका नाही.


आपल्याही ब्रँडची अशीच एखादी कथा घेऊन आपण नक्की समोर यावं! अशी आमची इच्छा आहे त्यासाठी आपण तयार आहात ना!

मग चला तर अशाच अनेक कथा घेऊन आम्ही आपल्या भेटीला येत आहोत. पुढील कथा कोणत्या ब्रँडची असेल ह्याची आम्हीसुद्धा आतुरतनेने वाट पाहत आहोत.

39 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page