top of page

नमस्कार आणि अभिनंदन 🙏💐

 

जे व्यावसायिक आपल्या व्यवसायवाढीसंदर्भात अतिशय गंभीरपणे विचार करत आहेत त्यांनीच पुढील पोस्ट वाचावी, ही नम्र विनंती. 🙏 

इतर व्यावसायिकांनी नेहमीप्रमाणे या पोस्टकडे दुर्लक्ष करायला काहीच हरकत नाही...

धन्यवाद आणि सदिच्छा 🙏💐

-  ब्रॅण्डबॉण्ड निलेश  

व्यावसायिक मित्रांनो,,

नमस्कार आणि अभिनंदन 🙏💐

 

आपले अभिनंदन अशासाठी की हा मजकुर आपण वाचत आहात म्हणजे आपण पहिली पायरी ओलांडली आहे. तसेच, आपल्या व्यवसाय वाढीसंदर्भात आपण अतिशय गंभीरपणे विचार करत आहात हे देखील यातुन स्पष्ट होत आहे. 

मला कल्पना आहे की व्यवसाय सुरू केल्यापासून व्यवसाय अनेक पटीने वाढविण्यासाठी आपण अगदी तन, मन आणि धन लावुन मेहनत घेत आहात. चढ-उतारांच्या अनेक अनुभवांनी संपन्न होत आहात. नव-नवीन गोष्टी शिकत आहात. आपल्या टीमला शिकवत आहात. विविध प्रयोग करत आहात. गुंतवणूक करत आहात. पण... 

 

पण आपण आणि आपला व्यवसाय तर तिथल्या तिथेच गोल गोल फिरतोय. जमा होत आहेत त्यापेक्षा जास्त खर्चच होत आहेत. अगदीच नुकसान होत नसेल पण अपेक्षित फायदाही होत नाहीये. प्रगतीचे काहीच चिन्ह दिसत नाहीये. स्वत:च्या व्यवसायातच नोकरी करत आहोत की काय असा भास होतोय.  

 

प्रचंड मेहनत घेऊनही जर का आपला व्यवसाय मनासारखा वाढत नसेल तर नक्कीच काहीतरी चुकतंय... पण नेमकं काय चुकतंय हे जर कळत नसेल तर आपल्याला गरज आहे एका उत्तम, अनुभवी, ऑलराऊंडर व्यावसायिक प्रशिक्षकाची... मार्गदर्शकाची. अर्थात, एक मस्त जबरदस्त कोच-मेंटरच आपल्याला आणि आपल्या व्यवसायाला सुयोग्य दिशादर्शन देऊ शकतो. 

मार्गदर्शक का हवा???
Why You Should Hire Business Coach / Mentor ???

आपल्याला माहिती-ज्ञान देणारे मदतीचे स्त्रोत अनेक असतात. जसे की, आपले मित्र आणि कुटुंबिय, गुगल, छापील साहित्य, विविध क्षेत्रातील तज्ञ, व्यवसाय-सॉफ्ट स्किल्स कार्यशाळा प्रशिक्षक आणि ओळखीचे व्यावसायिक मित्र. या सर्व माध्यमातून आपण स्वत:ला सतत अपडेट आणि अपग्रेड करत असतो. उद्योग जगतातील घडामोडींविषयी आणि संधींविषयी सतत माहिती घेत असतो. हे सर्व स्त्रोत आपल्याला भविष्यात येऊ शकणाऱ्या अडचणींविषयी, गरजांविषयी आपल्याला नेहमीच सल्ले देतात. सक्सेस टिप्स देत असतात.

 

मात्र हे नियमितपणे आणि सलग होत नाही. जेंव्हा आणि जसं शक्य होईल तसं आपण हे ज्ञान घेत असतो. त्यामुळे तिथे कुठेही शिस्त राहात नाही आणि परिणामी त्याचा उपयोग शून्य होतो.  

 

मात्र, केवळ एक सर्वगुणसंपन्न व्यवसायिक मार्गदर्शकच (Business Coach / Mentor) सर्व बाजूंनी विचार करून प्रसंगी स्वत: अभ्यास करून किंवा आपल्या ज्ञान आणि अनुभवाच्या आधारे वेळोवेळी आपल्याला शहाणपणाचा बहुमूल्य आणि परिणामकारक सल्ला देतात.

 

हे मार्गदर्शक आपल्याला केवळ सल्लाच देतात असे नाही तर असा सक्रिय मार्ग दाखवतात. व्यूहरचना सुचवतात जेणेकरून आपल्या व्यवसायाच्या वाढीवर थेट आणि सकारात्मक प्रभाव पडतो.

Office Workspace
Image by Nastuh Abootalebi

मार्गदर्शक कसा हवा???

What are the Best Qualities of a Business Coach / Mentor ??? 

  • आपला मार्गदर्शक आपल्यापेक्षा अधिक उद्योग-व्यवसायांचा अनुभव असलेला हवा. 

  • त्याला उद्योग-व्यवसाय क्षेत्राशी संबंधित अनेक विषयांचे ज्ञान असावे.  

  • आपला मार्गदर्शक कोणतेही कठीण आव्हान स्वीकारणारा असावा. 

  • आपला मार्गदर्शक आपल्या यश-अपयशाची जबाबदारी घेणारा असावा. 

  • आपला मार्गदर्शक स्मार्ट-ऊर्जादायी-महत्वाकांक्षी असणं अपेक्षित आहे. 

  • उत्तुंग कर्तुत्व, उत्तम वक्तृत्व आणि जबरदस्त नेतृत्वगुण तर असलेच पाहिजेत. 

  • हा मार्गदर्शक सक्रिय, सृजनशील आणि सकारात्मक विचारांचा असावा. 

  • थोडक्यात तो Multi-Dimensional + Multi-Tasker म्हणजेच व्यासंगी अष्टपैलु असावा.

 

एक उत्तम व्यवसायिक मार्गदर्शक आपल्यासोबत असण्याचे फायदे अनेक आहेत आणि नुकसान शून्य. खऱ्या अर्थाने आपल्याला व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर दीर्घ काळासाठी एक असा आदर्श व्यवसायिक मार्गदर्शक शोधा जो आपला मित्र, तत्वज्ञ, मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने आपल्या यशापयशातला भागीदार असेल.

Business Handshake_edited.jpg

Only Serious Entrepreneurs Click here to Join our "Free WhatsApp Club"

https://bit.ly/UCBK_FREEDOM_GRO10X_WA

 

वरील लेख वाचल्यानंतर आपल्याला उत्तम व्यवसायिक मार्गदर्शकाचे महत्त्व पटले किंवा जाणवले असेल व आजपासून पुढील किमान १००० दिवस आपल्यासोबत उत्तम व्यावसायिक मार्गदर्शक हवा असं जर मनापासून वाटत असेल तर आणि तरच ही खालील लिंक क्लिक करून आपल्या भावी मार्गदर्शकाचे
प्रोफेशनल प्रोफाईल वाचा. शिवाय त्यावरील सर्व लिंक्स क्लिक करून लेख वाचा / व्हिडिओ पाहा. 


Get Noticed, Be a BRAND!!! सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा!!!

Download E-Books for FREE!

Branding Books.png
bottom of page